Uddhav Thackeray Nashik Speech : 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल
नाशिक : 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री मग, मुख्यमंत्री कितीचा असेल, असा सवाल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण, मशाल बघा कशी पेटलेली आहे. राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केलं आहे. नाशिकमध्ये बुधवारी राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.