Igatpuri Tourists | आदेश झुगारून पर्यटक इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरात,प्रशासनाकडून दुर्लक्ष | नाशिक
पर्यटन स्थळांवर सध्या बंदी आहे मात्र अनेक पर्यटक त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या परिसरात बिनधास्त फिरत आहेत. यात कुठल्याही नियमांचं पालन केलं जात नाहीए, प्रशासनालादेखील याची काही कल्पना नाही, त्यामुळे प्रशासनाचं या गोष्टीवर दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय. वर्षा ऋतुमध्ये दरवर्षीच सर्वजण पर्यटन स्थळं गाठतात, वातातवरणही आकर्षित करणारं असतं मात्र सध्याच्या परिस्थितीचं भान राखून वागणं हे नागरिकांकडून अपेक्षित आहे.