Toll Price Increase : राज्यात पुन्हा एकदा टोलधाड, टोल दरात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी Nashik

Continues below advertisement
राज्यात पुन्हा एकदा टोलधाड पडणार आहे, राज्यातील टोल दरात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालाय., खराब रस्ते, सोयीसुविधांचा अभाव असताना देखील वाहनचालकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
टोल नाक्यावरच्या ह्या भल्या मोठ्या रांगा, फास्ट टॅग नसेल तर  आकारला जाणार दुप्पट दंड. मात्र फास्ट टॅग असूनही  फास्ट होत नसलेला प्रवास... टोल वसुली जोमात असली तरी रस्त्याची काम मात्र वर्षोनुवर्षे अर्धवट..  ही सर्व दृश्य आणि वाहांचालकांचा मनस्ताप बघितल्यानंतर टोल का द्यावा असा  संतप्त सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत.  मात्र जरा थांबा..  आता आम्ही जे सांगणार आहोत, त्यामुळे तुमच्या संतापाला पारावर उरणार नाही.  कारण याच रस्त्यासाठी आता तुम्हाला जादा टोल अदा करावा लागणार आहे.  लवकरच टोलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे ,कारण विधिमंडळ समिती कडून तसा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालाय.  टोलनाक्यावर सोयी सुविधां, स्वच्छतेचा अभाव, रांगा एवढया भल्या मोठ्या  की तुमचा नंबर लागे पर्यंत  पेरू, सफरचंद काकडी,काय आठवडा भराचा भाजीपाला ही खरेदी होईल, फास्ट टॅगच्या रांगा ही त्याला अपवाद नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram