Shubhangi Patil : शुभांगी पाटील यांना विजयी करण्यासाठी धुळ्यातील ठाकरे गट सरसावला

नाशिक पदवीधर विधान परिषद उमेदवार शुभांगी पाटील यांना विजयी करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गट ऍक्टिव्ह मोडवर आली असून शुभांगी पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे, या निवडणुकीत तांबे पिता पुत्राने काँग्रेसला कसं फसवलं हे पदवीधर मतदारांनी बघितलं असून यामुळे या लबाड लोकांना त्यांची जागा सुज्ञ मतदार दाखवून देतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.... नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना ठाकरे गट कामाला लागले असले तरी दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यांच्याशी संपर्क साधला असता या निवडणुकीबाबत लवकरच महाविकास आघाडीची बैठक होणार असून पक्षश्रेष्ठींकडून येणाऱ्या आदेशावर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola