Nashik Temperature | नाशिकमध्ये गारठा वाढला; नाशिककरांचा मिसळीवर ताव
नाशिकमध्ये किमान तापमानात पुन्हा घट झालेली बघायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून आज नाशिकमध्ये 10 तर निफाडमध्ये 7.2 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झालीय. पारा घसरताच मिसळ हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरातील मिसळच्या हॉटेल्समध्ये सकाळी सकाळी मिसळप्रेमीची गर्दी दिसून येत असून अंगात स्वेटर घालत मिसळचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल बाहेर त्यांनी रांगा लावल्याच चित्र बघायला मिळते आहे.