Narayan Rane UNCUT | शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा : नारायण राणे

सिंधुदुर्ग : विकासकामांना विरोध करायचा आणि उदघाटनावेळी आयत्या बिळावर नागोबा, अशा शब्दांत नारायण राणेंची शिवसेनेवर टीका केली. सिंधुदुर्गात राणेंच्या मेडिकल कॉलेजचे अमित शाह यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी अमित शाह यांच्यासमवेत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.

नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या लाईफटाईम वैद्यकिय महाविद्यालयाचा उदय़घाटन सोहळा पार पडला आणि व्यासपीठावर आलेल्या उपस्थित मान्यवरांनी राजकीय टोलेबाजीला सुरुवात केली. सदर रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या उभारणीला शिवसेनेचा अधिकाधीक विरोध झाला. कोकणात विमातळ उभारणीलाही शिवसेनेचा मोठा विरोध झाला. पण, खरं म्हणजे विकासकामांना विरोध करायचा आणि उदघाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखं यायचं म्हणजेच तर शिवसेना अशी बोचरी टीका राणेंनी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola