Maharashtra Corona Update : नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले, कोरोनाही वाढतोय
कोरोना नियंत्रणात येत नाही तोच आता स्वाईन फ्लू ने चांगलच डोकं वर काढलं असून नाशिक शहरात उपचार घेणाऱ्या अकरा जणांचा स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झालाय. मृतांमध्ये नाशिक शहर 3, नाशिक ग्रामीण - 4, अहमदनगर - 3 आणि पालघरच्या एका रुग्णाचा समावेश आहे, गेल्या एक महिन्याच्या कालावधीत हे मृत्यू झाले असून काल अहवाल प्राप्त होताच स्वाईन फ्लू मुळे हे रुग्ण दगावल्याच समोर आलय. चिंताजनक बाब म्हणजे नाशिव शहरात स्वाईन फ्लू चा प्रादुर्भाव वाढत असून चालू ऑगस्ट महिन्यातच आजपावेतो 64 जणांना स्वाईन फ्लू ची लागण झालीय आणि हिच सर्व परिस्थिती बघता आरोग्य विभागही सतर्क झाला असून महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात स्वतंत्र स्वाईन फ्लू कक्षही सुरू करण्यात आलाय. काळजी घ्या आणि या आजाराची लक्षणं आढळल्यास तातडीने उपचार घ्या असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं नागरिकांना करण्यात येते आहे.