Suhas kande to Meet Aditya Thackeray : बंडखोर आमदार सुहास कांदे आदित्य ठाकरेंना भेटणार ABP Majha

शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना आज थेट बंडखोर आमदारांचाच सामना करावा लागण्याची चिन्हं आहेत. कारण आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज मनमाडचे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात आहे.  आणि कांदे यांनी या दौऱ्यात चार ते पाच हजार कार्यकर्त्यांना घेऊन आदित्य ठाकरे यांना भेटणार असल्याचं जाहीर केलंय. माझं काय चुकलं अशा आशयाचं निवेदन घेऊन कांदे आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदार आमनेसामने येण्याची चिन्हं आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola