Mahad: Mahad Gandhari Bridge ला तडे गेल्याने कधीही पूल कोसळण्याची शक्यता
तालुक्यातील गांधारी पूल हा ब्रिटिश काळातील असून,शेवटची घटका मोजतोय या पुलावरील ब्या्रिगेड मोडक्या अवस्थेत आहेत. या पुलाला खालून तडे गेले असून,हा पूल कधीही कोसळू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहन चालक व पादचारी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.यामुळे नगरपरिषदेने तात्काळ या पुलाची पहाणी करून सदर पूल हा धोकादायक असल्याने अवजड वाहनांसाठी गांधारी पूल पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दोन्ही बाजूला अवजड वहाणे जाऊ नयेत यासाठी ब्या्रिगेड लावण्यात आले असून अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद चे सूचना फलक लावण्यात आले आहेत