Sudhakar Badgujar Nashik : सुधाकर बडगुजर यांची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी
abp majha web team
Updated at:
17 Dec 2023 08:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSudhakar Badgujar Nashik : सुधाकर बडगुजर यांची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी शिवसेना उबाठा गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची आज सलग तिसऱ्या दिवशी नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशी केली असून रविवारी आणि सोमवारी ही चौकशी केली जाणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे, पालकमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळ अधिवेशनात सुधाकर बडगुजर यांचे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचे व्हिडिओ आणि फोटो दाखवले होते. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँच ने सुधाकर बडगुजर आणि व्हिडिओत दिसणाऱ्या संबंधित व्यक्तींशी चौकशी करण्यास सुरुवात केली. आज सलग तिसऱ्या दिवशी तब्बल अडीच तास बडगुजर यांची चौकशी करण्यात आली.