Nashik ST Bus Restart : नाशिकमध्ये एसटी बससेवेला सुरुवात, पहिल्या दिवशी 200 बस रस्त्यावर

जवळपास दोन महिन्यांनंतर आजपासून (7 जून) महाराष्ट्र अनलॉक झाला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यानुसार सर्वसामान्य मुंबईकरांना बेस्ट बसमधून तर पुणेकरांना पीएमपीएमएल बसमधून प्रवास करता येणार आहे. आतापर्यंत घरपोच मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद थेट हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन घेता येणार आहे. थिएटर्सवरच्या खुर्च्यांची धूळ आता हटणार आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करता येणार आहे तर सलून, स्पा आणि पार्लरचं शटरही उघडणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola