Nashik | रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण;जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Continues below advertisement
एका दिड वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात समोर आली असून जिल्हा रुग्णालयाचा सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय. अपह्रत मुलीला घेऊन तिची आई आणि मावशी आज सकाळी 11.30 च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. बहिणीला बाळंतपणासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने मुलीची आई धावपळ करीत होती. यावेळी ती चिमुकली प्रसूती कक्षाबाहेरच झोपी गेली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आई बाहेर आल्यानंतर मुलगी दिसेनासी झाल्याने आईने सर्वत्र शोधाशोध केली मात्र ती आढळून आली नाही. याचवेळी पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक व्यक्ती मुलीला खांद्यावर घेऊन जाताना दिसून आला. या प्रकारामुळे नाशकात एकच खळबळ उडालीय याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरु असून संशयिताचा शोध सध्या पोलिस घेतायत. हे कुटुंब परप्रांतीय असून मूळचे ते मुंबईचे आहेत मात्र बहिणीच्या प्रसूतीसाठी ही महिला मुलीसोबत नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी दाखल झाली होती.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram