Pooja Chavan Suicide | पूजा आत्महत्या करेल असं वाटत नाही : शरद राठोड

Continues below advertisement

उस्मानाबाद : पूजाच्या आत्महत्येला वनमंत्री संजय राठोड जबाबदार आहेत, यात आम्हाला काही तथ्य वाटत नाही, असं पूजा चव्हाणचे भाऊजी शरद राठोड यांनी सांगितलं. तसंच समाजाकडूनही आमच्यावर दबाव नाही, असंही त्यांनी नमूद केलं. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी पूजा पुण्याला का गेली होती? संजय राठोड आणि तिची भेट कधी झाली होती याबाबत भाष्य केलं.

मूळची परळीची असलेल्या पूजा चव्हाणने पुण्यातील वानवडी परिसरात रविवारी (7 फेब्रुवारी) आत्महत्या केली होती. या आत्महत्येला राज्याचे वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यातच संजय राठोड यांचा फोन नॉट रीचेबल असल्यामुळे हे प्रकरण आणखीच तापलं आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram