ShivJayanti 2020 | नाशिकमध्ये रॅली काढून शिवजयंती साजरी, वाहनांवर शिवरायांचे मोठे स्टिकर्स
गणेशोत्सवात ज्या पद्धतीने घराघरात गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते त्याच पद्धतीने घराघरात शिवजयंती साजरी केली जावी असा विचार नाशकात आता पुढे येऊ लागला आहे. त्यातूनच नाशिकमध्ये मंत्रोच्चाराच्या गजरात ((षोडशोपचारे)) शिवरायांची जयंती साजरी केली जात आहे.