Sharad Pawar Birthday : अजित पवार गटाच्या देविदास पिंगळेंकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
शरद पवार हे वाढदिवसाला नाशिकमध्येच असल्याने काल रात्रीपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता. अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार गटात गेलेल्या एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आला नसताना पिंगळे शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. आज साहेबांना शुभेच्छा देताना संकोच वाटल्याची प्रामाणिक कबुली त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसंच यापुढे अजितदादांसोबतच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी