Shantigiri Maharaj Nashik : शांतीगिरी महाराजांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं, माघार न घेण्यावर ठाम
Continues below advertisement
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) माघार घ्यावी, यासाठी महायुतीकडून (Mahayuti) सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र शांतीगिरी महाराज शेवटपर्यंत अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. शांतीगिरी महाराजांना निवडणुकीसाठी बादली चिन्ह देण्यात आले आहे.
Continues below advertisement