रोजगार गेला म्हणून बनावट नोटा छापण्यास सुरुवात, भाजीविक्रेतीच्या सतर्कामुळे नाशिकमधून सात जणांना अटक
Continues below advertisement
नाशिक : कोरोना काळात हातचा रोजगार गेला आणि बेरोजगारीचं संकट ओढावलं. मग आता पोटापाण्यासाठी काय करायचं म्हणून एका गँगने चक्क नोटा छापण्याचा छापखानाच सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस. नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत बनावट नोटा छापणाऱ्या 7 जणांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. किती बनावट नोटा चलनात आणल्या याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
Continues below advertisement