Saptashrungi | सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात गाभाऱ्यातून दर्शन घेण्यास बंदी | ABP Majha
पूर्ण शक्तीपीठ, तसंच लाखोंची कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या वणी गडावरच्या सप्तश्रृंगी देवीची. यापुढे सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार नाहीय. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी सप्तश्रृंगी देवस्थानानं हा निर्णय घेतल्याचं कळतंय. आजवर देवीच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेता यायचं.. मात्र आता आरती आणि पुजेच्या वेळी नोंदणी केलेल्या भाविकांनाच गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार आहे.. त्यासाठी पुरुषांनी सोवळं आणि महिलांनी साडी परिधान करणं अनिवार्य असणार आहे. 1 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल