Samir Bhujbal on Manmad APMC Elections : सत्ताधाऱ्यांकडूृन दबावतंत्र, समीर भुजबळ यांचा आरोप

Samir Bhujbal on Manmad APMC Elections : सत्ताधाऱ्यांकडूृन दबावतंत्र, समीर भुजबळ यांचा आरोप

मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत 'हाय होल्टेज ड्रामा ' सुरू आहे... बाजार समितीचे सहलीला गेलेले दोन्ही पॅनलचे मतदार मनमाडमध्ये दाखल झालेत. मनमाड बाजार समितीत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. शिर्डीत झालेल्या हाय व्होल्टेज  ड्राम्यानंतर आज दोन्ही पॅनलच्या वतीने  खबरदारी घेत मतदारांना खाजगी लक्झरी बसद्वारे मतदान केंद्रावर आणण्यात  येत आहे. सत्ताधारी आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदारांनी आव्हान उभे केल्याने नाशिक जिल्ह्याचे या निवडणूकीकडे लक्ष लागले आहे.महाविकास आघाडीचे नेते समीर भुजबळ स्वतः या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. सत्ताधाऱ्याकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असून मतदार त्याला भीक घालणार नाही विजय महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola