Saibaba Shirdi :भाविकांना उन्हात उभं राहण्याची परिक्षा कोण घेतं? : ABP Majha

साईबाबांची शिर्डी म्हणजे तमाम भारतीय आणि परदेशी भाविकांचं श्रद्धास्थान... तिरुपतीनंतरचं देशातील दुसरं आणि राज्यातील सर्वधिक श्रीमंत समजल्या देवस्थान अशी शिर्डी संस्थानची ओळख आहे... अशा या साईबाबांच्या शिर्डीत रोज हजारो तर उत्सव व सुट्टीच्या काळात लाखो भाविक आवर्जून दर्शनासाठी येतात... पण प्रचंड गर्दीमुळे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी तासनतास दर्शनरांगेत उभं राहण्याची वेळ भाविकांवर येते.... साईबाबा संस्थानचा महत्वाकांक्षी असलेल्या दुमजली वातानुकूलित दर्शनरांग कॉम्प्लेक्सचे काम तीन महिन्यांपू र्वी पूर्ण होऊनही उदघाटन सोहळा लांबल्याने भाविकांना ही सुविधा मिळत नाही... भाविकांच्या देणगीतून उभारली गेलेली सुविधा भाविकांना मिळत नाहीये...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola