साई बाबा संस्थान विश्वस्त मंडळ राज्य सरकारकडून जाहीर, NCP MLA Ashutosh Kale यांची अध्यक्षपदी निवड
शिर्डी : शिर्डी साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. 12 जणांचे विश्वस्त मंडळाचे गॅझेट काढून जाहीर केलं आहे. यात अहमदनगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येतंय.