Nanded मध्ये 75 हजार जणांचं लसीकरण, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाचा संकल्प
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याचे औचित्य साधून जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी 75 हजार लसीकरणाचा संकल्प जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व यामूळे गत दिड वर्षात बाधितांना सोसावे लागणारे कष्ट लक्षात घेता अधिकाधिक लसीकरण करण्याशिवाय तरणोपाय नसल्याचे अवघ्या जगाच्या लक्षात आले आहे. जिल्हा प्रशासनाने विविध संस्थाच्या माध्यमातून लसीकरणासाठी व्यापक मोहिम हाती घेतली असून सार्वजनिक गणेश मंडळानाही यात पुढाकाराचे आवाहन केले आहे. आरोग्य विभाग, महानगरपालिका, विविध सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमातून 75 हजार लसीकरणाचा हा संकल्प पूर्ण करु असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केलाय.