Shirdi Saibaba Temple : लवकरच शिर्डीच्या साईबाबांचे ऑफलाईन दर्शन घेता येणार
Shirdi Sai Baba: महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे पुन्हा एकदा बंद करण्यात आली. मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट पाहता घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. कोरोनाचा धोका कायम असल्याने सर्व धार्मिक स्थळांसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिर्डीतील साई मंदिर खुले करण्यात आले असून साईभक्तांना (Shirdi Sai Baba Temple) ऑनलाईन प्रवेश दिला जातोय. मात्र, ऑनलाईन पासच्या नावाखाली शिर्डीत गोरखधंदा सुरू झाला आणि भाविकांची गैरसोय होत असल्याचे साई संस्थानच्या लक्षात आले. ज्यामुळे साई संस्थानने साई मंदिरात ऑफलाईन पास सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवलीय.