Nashik : मंत्र्यांची ओळख सांगत शाळा अनुदानित करण्याचं खोटं आश्वासन, फसवणूक करणारा अटकेत

Nashik Fraud: शिक्षणंत्र्यांसह अनेक नेतेमंडळी ओळखीचे आहेत असं भासवून विनाअनुदानित शाळा अनुदानित करुन देतो, असं सांगत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. राहुल आहेर या तरुणानं ही फसवणूक केलीय. नाशिकच्या वणी पोलिसांनी अटक या तरुणाला अटक केली असून तो दिंडोरीतील शिंदवड गावचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे त्याच्या चारचाकी गाडीवर मंत्रालयाच्या प्रवेशिकेसह शासनाचा लोगो असून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नावाचे लेटरहेडही कारमध्ये आढळलंय. एवढंच नाही तर राहुल आहेरचे फेसबुकवर राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, नरहरी झिरवळ, रोहित पवारांसह अनेक नेत्यांसोबत फोटो असल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola