Special Report | अपंगत्वावर मात करत स्टीफन व्हॉर्मन्स यांची 'सायक्लोथॉन 2020' मधून जनजागृती

Continues below advertisement
अनंत आमुची ध्येयासक्ती या उक्तीला सार्थ ठरवलंय जर्मनीच्या 49 वर्षीय दिव्यांग पर्यावरणप्रेमीनं. मूळचे जर्मनीचे असलेले आणि दिव्यांगावर मात करत सध्या जगभर भ्रमंती करुन सायकलचे महत्व तसेच पर्यावरणाचा संदेश देत सायक्लोथॉन 2020 च्या माध्यमातून जनजागृती करणारे स्टीफन व्हॉर्मन्स काल पुण्याहून नाशिकमध्ये दाखल झाले. 12 ते 19 फेब्रुवारीपर्यंत ते महाराष्ट्राची सफर करणार आहेत. कोल्हापूरपासून त्यांच्या या उपक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर कराड, सातारा, पुणे, नाशिक मार्गे ठाण्याला याचा समारोप होणार आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram