Nashik City Link Workers Strike : नाशिकमध्ये सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

Nashik City Link Workers Strike : नाशिकमध्ये सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे नाशिक महापालिकाची सिटीलिंक बससेवा आजपासून पूर्ववत सुरू झालीय गेल्या थकित वेतन, दंडाची आकारणी, बोनस यासह विविध मागण्यांसाठी सिटीलिंकच्या वाहकानांनी तीन दिवसांपासून संप पुकारला होता, रविवारी कर्मचारी प्रतिनिधी, ठेकेदार , सिटीलिंक अधिकारी यांच्यात बैठक पार पडली त्यात कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात तोडगा काढण्यात आला, जून महिन्याचे वेतन 9 ते 10 तारखे पर्यंत आणि जुलैचे वेतन 31 ऑगस्ट पर्यन्त देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दर महिन्याच्या 9 तारखे पर्यन्त वेतन अदा करण्याचे, अन्यायकारक दंड आकारणी कमी करणे, थकित बोनस आणि युनिफॉर्म बदलण्याविषयी वरीष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे    आश्वासन देण्यात आलंय, त्यांमुळे संप मागे घेण्यात आलाय. मात्र वारंवार होणाऱ्या संपमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने पुन्हा सम्प नको अशी भावना प्रवासी व्यक्त करत आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola