Nashik: पहिल्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद ABP Majha
एक धक्कादायक बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या एका हॉटेलमध्ये पहिल्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. एक्सिलन्सी ईन हॉटेलमध्ये नूतनीकरण सुरु होतं. त्यासाठी तोडलेलं बांधकाम लक्षात न आल्यानं विनोद गिते हा तरुण थेट खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.