रविवारपर्यंत नाशिक शहरात पाऊस न आल्यास एक दिवस कोरडा दिवस पाळणार, महापौर सतीश कुलकर्णी यांची घोषणा
नाशिक शहरातील पाणी कपातीचे ढग अधिकच गधड झाले असून पुढील आठवड्यापासून पाणी कपातीची शक्यता आहे. येत्या रविवार पर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही तर पुढील आठवड्यापासून दर बुधवारी कोरडा दिवस पाळला जाणार आहे.
त्याही पुढे पावसाने ओढ दिली तर आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस पाणी कपात केली जाणार आहे, जुलै महिना मध्यावर आला तरीही पावसाला सुरवात नसल्यानं गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा 25 टक्यावर आल्यानं महापौर सतीश कुलकर्णी यांनी आढावा बैठक बोलावली होती, बैठकीनंतर दर बुधवारी पाणी कपातीची घोषणा करण्यात करण्यात आली आहे.