Nashik Wedding Politics : ठाकरे गटाच्या नेत्याच्या मुलीच्या लग्नाला Eknath Shinde जाणार
Nashik Wedding Politics : ठाकरे गटाच्या नेत्याच्या मुलीच्या लग्नाला Eknath Shinde जाणार
नाशिकमध्ये आज दोन मोठ्या लग्न समारंभाची चर्चा सध्या जोर धरतेय...ठाकरे गटाच्या नेत्याच्या मुलीच्या लग्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत...महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या घरी लग्नसोहळा आहे...या सोहळयाचं उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण आहे... मात्र ते जाणार की नाही याबाबत अद्याप निश्चित माहिती नाहीये...खासदार संजय राऊत मात्र या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत...दुसरीकडे फडणवीसांच्या पुतण्याचं देखील लग्न आहे...माजी मंत्री शोभा फडणवीसांचे नातू तन्मय यांचा विवाह सोहळा देखील नाशकात पार पडतोय..संदिप सुराणा यांची कन्या सिद्धी यांच्याशी बा विवाह पार पडतोय...फडणवीस या लग्नासाठी कालपासून नाशकात मुक्कामी आहेत...राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन देखील नाशकात दाखल होणार आहेत...