Maratha Samaj on Dowry : हुंडा प्रथेविरोधात आचारसंहिता लागू करा, पैशांसाठी मुलींचे छळ बंद करा

Continues below advertisement

Maratha Samaj on Hunda : हुंडा प्रथेविरोधात आचारसंहिता लागू करा, पैशांसाठी मुलींचे छळ बंद करा

पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, मराठा समाजात निर्माण झालेल्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी अहिल्यानगर येथील मराठा समाजाच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते... या बैठकीत मराठा समाजाकडून लग्नात केल्या जाणाऱ्या खर्चाबाबत , बडेजाव बाबत तसेच हुंडा प्रथेविरोधात एक आचारसंहिता घालून देण्याचं ठरवण्यात आलं...ज्यात हुंडा देऊ नये त्याऐवजी, मुलीच्या नावाने मुदत ठेव करावी...पैशांसाठी मुलीचा छळ करू नये... 'प्री-वेडिंग' प्रकार बंद करावा जर प्री-वेडिंगचे फोटो किंवा व्हिडिओ लग्नात स्क्रीनवर दाखवले तर प्रतिष्ठित व्यक्ती विवाह सोहळा सोडून निघून जातील... लग्न सोहळा १०० ते २०० लोकांमध्येच करावा... डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये आणि लोक कलावंतांचा वापर करावा...असे अनेक मुद्दे सांगण्यात आले मात्र ही आचारसंहिता का करावी लागली? ही आचारसंहिता मराठा समाज स्वीकारेल का? जर आचारसंहिता स्वीकारली नाही तर मराठा समाजाचे पुढचे काय पाऊल असेल या संपूर्ण प्रश्नांबाबत ही आचार संहिता घालून देणाऱ्या मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी बातचीत केलीये आमचे अहिल्यानगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola