Nashik: नाशिकमध्ये जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी ABP Majha

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील हाणामारीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही, येवला तालुक्यातील -कोटमगाव इथं  दोन गटामध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडलीय. जुन्या वादातून झालेल्या भांडणाचं पर्यावसन हाणामारीत झालं. यात एका महिलेलाही काठ्यांनी मारहाण झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता येवला पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल केलाय. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे. मागील आठवड्यात निफाडमध्येही तरुणाच्या दोन गटात हाणामारी झाली होती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola