Nashik Rain Update :द्राक्षबागांनाही अवकाळीचा फटका ABP Majha

Continues below advertisement

ऐन हिवाळ्यात पावसानं हजेरी (Rain Updates) लावल्यामुळं राज्यभरात दाणादाण उडाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसांसाठी राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मुंबईतही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कालपासूनच मुंबईत पावसाची संततधार पाहायला मिळाली. याशिवाय मुंबई लगतच्या उपनगरांतही पावसानं धुमाकूळ घातला. 

राज्यात जणूकाही जुलै महिना परतलाय की काय, असं वातावरण आहे. कारण हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातल्या काही भागात चांगलाच पाऊस बरसतोय. मुंबई शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस झालाय. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारला काल संध्याकाळपासून पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. नवी मुंबईतील खारघर, बेलापूर, कळंबोली आणि पनवेल भागातही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार सरी अधूनमधून हजेरी लावताहेत. काल संध्याकाळपासून अवकाळीनं मुंबईसह एमएमआरडीए भागात विश्रांती घेतलेली नाही.  

ऑक्टोबरमध्ये हिट आणि पावसाळा अनुभवल्यानंतर नोव्हेंबरमध्ये देखील वरुणराजा बरसल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात पावसानं हजेरी लावली आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्यानं आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे. अशातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे. तिकडे विदर्भात मात्र थंडीने जोर पकडला असून अनेक जिल्ह्यातील किमान सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस खाली आलं आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये गारवा निर्माण झाला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram