Nashik Kumbh Mela 2026 | नाशिक, त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा; 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात
Nashik Kumbh Mela 2026 | नाशिक, त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा; 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात
कुंभमेळ्यासंदर्भात मोठी बातमी... नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर झाल्यात.. ३१ ऑक्टोबर २०२६पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे.. हा कुंभमेळा २४ जुलै २०२८पर्यंत सुरू राहणार आहे.. या कुंभमेळ्यात४२ ते ४५ पर्वस्नान असणार आहेत.. एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यात तारखा निश्चित करण्यात आल्यात..
दरम्यान कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा कशा काढल्या जातात, त्रिखंडी कुंभमेळा म्हणजे काय याबाबत नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी काय माहिती दिलीये..बघुयात..
कुंभमेळ्याच्या तारखा कशा ठरतात? ३१ ऑक्टोबर २०२६ पासून जुलै २०२८ पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार या काळात गुरू सिंह राशीत प्रवेश करतो, मग कर्क आणि त्यानंतर कन्या राशीत जातो म्हणून याला त्रिखंडी कुंभमेळा असं म्हटलं जातं यापूर्वी असा योग १९५६-५७ मध्ये आला होता यंदाच्या कुंभमेळ्यात ४२ पर्व स्नान येतील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्रत्येकी शाहीस्नान होणार एक पर्वणी दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी सोमवती अमावस्या, श्रावण वैद्य अमावस्या, एकादशी, ऋषी पंचमी हे चार महत्त्वाचे स्नान पर्व