Nashik : नाशिकमध्ये विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांच्या कुटुंबातील विवाह कार्यक्रमात नियमांचं उल्लंघन
Continues below advertisement
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या कुटुंबातील विवाह सोहळयातला एक कार्यक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांवर नियम मोडल्यानं कारवाईचा बडगा उगारला जात असताना, बड्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय कसा? हा प्रश्न उपस्थित होतोय. काल रात्री १० वाजल्यानंतर उशिरापर्यत उपमहानिरीक्षकांच्या शासकीय निवासस्थानी गीत मैफिलीचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Continues below advertisement