Uddhav Thackeray : नाशिकचे शिवसेनेचे माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, एकनिष्ठेचं शपथपत्र घेणार?

नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंचा शिवसंवाद दौरा होताच दोनच दिवसांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नाशिकमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना भेटणार आहेत. उद्धव ठाकरे दुपारी बारा वाजता मातोश्रीवर पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नगरसेवकांसोबत प्रत्यक्षपणे संवाद साधणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षांतर टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जातेय. पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचं प्रतिज्ञापत्रही नगरसेवकांकडून लिहून घेतले जाईल अशी शक्यता आहे. नाशिकमधील काही नगरसेवक शिंदे गटात सामील होतील अशी चर्चा रंगलेली असतांनाच आज होणारी ही बैठक सर्वच बाजूने महत्वाची ठरणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola