Shiv Jayanti 2020 | नाशिकमध्ये घरोघरी शिवजन्मोत्सव, मंत्रोच्चारात शिवजयंती साजरी
नाशकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गणेशोत्सवात ज्या पद्धतीने घराघरात गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते त्याच पद्धतीने घराघरात शिवजयंती साजरी केली जावी असा विचार नाशकात आता पुढे येऊ लागला आहे. त्यातूनच नाशिकमध्ये मंत्रोच्चाराच्या गजरात ((षोडशोपचारे)) शिवरायांची जयंती साजरी केली जात आहे. शिवाजी महाराज यांचा देखावा सादर केला असून शस्त्रपूजन केले जाणार आहे..