Nashik : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम ठळक, शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 50 टक्क्यांनी कमी

Continues below advertisement

नाशिक शहरात गेल्या चार दिवसात तब्बल 586 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालीय. या वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या हजेरीवर दिसून येतोय. गेल्या 3 दिवसांपासून विद्यार्थ्यांची संख्या 50 टक्क्यांनी कमी झाली असून पालकांच्या मनात भिती निर्माण झाल्याने ते आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायला तयार नसल्याचं शिक्षकांकडून सांगण्यात येतय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नाशिक जिल्हा प्रशासन शाळांबाबत काय निर्णय घेणार ? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलय. दरम्यान नाशिकच्या रचना विद्यालयातून आढावा घेत मुख्याध्यापिकांशी सवांद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram