Nashik : आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने त्र्यंबकेश्वरच्या सावरपाडा येथे उभारण्यात आलेला पूल वाहून
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून तास नदीवर बसवण्यात आलेला पूल यंदाच्या मुसळधार पावसात वाहून गेलाय. या सावरपाड्यातील महिलांचा पाण्यासाठी जीवघेण्या प्रवासाची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. त्याची दखल घेत आदित्य ठाकरेंनी इथे पूल बसवण्याचे प्रशासनाला आदेश दिले होते. मात्र त्यावेळी पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी प्रशासनानं दुर्लक्षित केली होती. मुसळधार पावसात तास नदीला पूर आल्यानं काही दिवसांपूर्वी हा पूल पाण्याखाली गेला होता. आणि आता प्रवाहाच्या जोरामुळे हा पूलच वाहून गेलाय त्यामुळे सावरपाड्याच्या महिलांना पुन्हा एकदा पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. दरम्यान शिवसंवाद यात्रेसाठी नाशिक दौऱ्यावर येणारे आदित्य ठाकरे या भागाला भेट देणार का याची स्थानिकांना प्रतीक्षा आहे.