Nashik Satyjeet Tambe : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजपचा कुठल्या अपक्षाला पाठिंबा?

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारतोफा आता थंडावल्यात. उद्या मतदान होणार आहे. तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.... दरम्यान प्रचार संपून काही तास उलटले तरीही नाशिकमध्ये कुठल्या अपक्षाला पाठिंबा द्यावा यावर भाजपचा सस्पेन्स कायम आहे...नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत होणार आहे. भाजपनं उमेदवार न दिल्यानं अपक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय झालाय.. पण अद्याप तो अपक्ष कोण हे स्पष्ट केलेलं नाहीए.. त्या अपक्षाचं नाव अजूनही गुलदस्त्यात आहे....काल संध्याकाळी भाजप पाठिंबा जाहीर करणं अपेक्षित होतं मात्र अजूनही भाजपचं ठरत नाहीए... दरम्यान काल प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी दिवसभर सभा, मेळावे आणि गाटीभेटींवर भर दिला.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola