Sarthi Office Inauguration : सारथी कार्यालयाच्या उद्घाटनावरुन वाद, संभाजीराजेंना डावलल्याचा प्रकार?
नाशिकमधील सारथी कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झालाय. सारथीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा २१ ऑक्टोबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत संभाजीराजेंना डावलल्यानं स्वराज्य संघटनेनं नाराजी व्यक्त केलीय. संभाजीराजे यांना डावलल्यास कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी दिलाय.