Nashik मध्ये मिठाई व्यावसायिककडून खंडणी वसूल,सागर मिठाईच्या दुकानातील घटना : ABP Majha

Continues below advertisement

'मिठाईत झुरळ निघाले, तुमची तक्रारच करतो' अशी धमकी देऊन मिठाई व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या अजय ठाकूर नावाच्या एका भामट्याविरोधात नाशिकच्या गंगापूर आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाकूरने शहरातील कॉलेज रोडवरील सागर स्वीट्सच्या दुकानात गेल्या महिन्यात बासुंदी खरेदी करत त्यात झुरळ टाकले आणि त्यानंतर तुमची अन्न, औषध प्रशासन विभागाकडे तक्रारच करतो असं म्हणत मालकाकडून एक लाख रुपये त्याने उकळले विशेष म्हणजे ही घटना ताजी असतांनाच गंगापूर रोडवरील मधुर स्वीट्सच्या दुकानात दोन दिवसांपूर्वी ठाकूरने रबडी खरेदी करत ह्यात झुरळ असल्याचे दाखवत सोशल मीडियात तुमची बदनामी करेल, अन्न औषध प्रशासन विभागात तक्रार करेल अशी धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी ५० हजारांची मागणी केली. दरम्यान संबंधित व्यक्ती ही सागर स्वीट्सच्या मालकाकडून पैसे उकळणारीच असल्याचं लक्षात येताच मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आणि त्यांनी एकत्र येत थेट पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे अजय ठाकूर या भामट्याने आजवर अशाप्रकारे अनेक हॉटेल आणि मिठाई व्यावसायिकांना धमवकत खंडणी मागितल्याच पोलिस तपासत समोर आलं असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram