CM Eknath Shinde on Vedanta Foxconn : प्रकल्पांवरुन राजकारण करणार नाही, मुख्यमंत्री थेट बोलेले
गुजरातला गेल्यानंतर आता महाराष्ट्राला त्याच तोडीचा प्रकल्प देण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलंय..... या प्रकल्पावरून सुरु झालेल्या वादानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर काल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत या प्रकल्पाच्या तोडीचा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी दिली.....