Nashik Road : नाशकातील आठ रस्ते बंद,काँक्रीटीकरणामुळे 18 महिने रस्ते बंद : ABP Majha
नाशिक महानगरपालिका समोरील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम सुरू होणार असल्याने या रस्त्याला जोडणारे 8 रस्ते पुढील 18 महिने वाहतुकीसाठी बंद राहणार असल्यानं नाशिककरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. Cbs चौक ते कॅनडा कॉर्नर पर्यंतच्या साधारण 1300 मीटर रस्त्याचे काम पुढील 18 महिने सुरू राहणार आहे. या मुख्य रस्त्याचे टप्या टप्यान केले जाणार असल्याने एकेरी वाहतूक काही दिबस सुरू राहणार आहे मात्र या रस्त्याला जोडणाऱ्या 8 रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाचा अवलंब केला जाणार आहे. Cbs ते कॅनडा कॉर्नर दरम्यानचा रस्ता शहराच्या मध्यवर्ती भागातील ,कायम वर्दळीचा मुख्य रस्ता आहे, याचा मार्गावर अनेक महापालिका, खाजगी कार्यलय, , व्यावसायिक संकुल असल्यानं आजूबाजूला रहिवासी परीसर असंख्य नागरिकांना गैरसोयीचा सामना2करावा लागणार आहे, ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रस्त्याचे काम हाती घेतले जाणार असल्याने vip दौऱ्यानाही त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे,आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी