Nashik Rains : जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले, पैठणच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता
नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा जायकवाडी धरण तुडुंब भरुन वाहतंय... आणि आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आलेत. सध्या जायकवाडीतून दीड लाख क्यूसेकनं विसर्ग सुरु आहे... गरज पडल्यास दीड लाख क्यूसेकनं आज विसर्ग करण्यात येणार आहे... त्यामुळे पैठण शहरातील सखल भागात पाणी शिरण्याची भीती आहे... पैठण शहरातील साडेसहाशे कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.. दुसरीकडे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय.. आणि दवंडी देखील पिटल्या जातात...