ABP News

Nashik : पीएसआयच्या 123व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ, मीना झाडे यांना अहिल्याबाई होळकर कप

Continues below advertisement

Nashik : पीएसआयच्या 123व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ, मीना झाडे यांना अहिल्याबाई होळकर कप प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 123 व्या तुकडीचा दिक्षांत संचलन सोहळा सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी संजय कुमार यांच्या उपस्थितीत आज सकाळी महाराष्ट्र पोलीस अकादमीत  मोठ्या दिमाखात पार पडला. 9 महिन्यांचा खडतर प्रशिक्षणाचा काळ त्यांनी पूर्ण केला असून आज अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालय. हा सोहळा बघण्यासाठी प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबासह नाशिककरही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर कप मीना केशवराव झाडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे तर यंदाचा मानाचा रिव्हॉल्वर ऑफ ऑनर पैठणच्या सलमान जाहीर शेख यांनी पटकावला आहे. सलमान हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेतून झाले आहे. मुलगा पोलीस अधिकारी झाल्याने शेख कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गोर गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया सलमान शेख यांनी एबीपी माझाशी बोलतांना दिली असून मुलाने आमचं स्वप्न पूर्ण केल्याचं सांगताना वडीलांना आनंदाश्रू अनावर झाले होते.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram