Nashik Pregnancy : नाशकात डॉक्टर आणि नर्स हजर नसल्यानं आईलाच करावी लागली मुलीची प्रसूती

Continues below advertisement

एकीकडे नागपूरमध्ये यूट्यूबवर बघून मुलीने स्वत:चीच प्रसूती केलीये. तर दुसरीकडे आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि नर्स हजर नसल्याने एका आईलाच मुलीची प्रसूती करावी लागलीये. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याचीवाडी गावातील महिला प्रसूतीसाठी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती..मात्र या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक नसल्याने सोनाबाई आव्हाटेंनी मुलीची प्रसूती केल्याचं म्हटलंय. एकीकडे आरोग्य केंद्रावर भोंगळ कारभाराचा आरोप होतोय..तर दुसरीकडे हे आरोप आरोग्य सेविकेने फेटाळलेत. आता या संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून समिती गठीत केली जाणारेय.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram