Nashik : टाळ-मृदुंगावर थिरकणं पोलिसांनाही आवरेना! बाप्पाला निरोप देताना पोलिसातील वारकरी जागा
Continues below advertisement
ऊन, वादळ, पाऊस असो किंवा मग कुठलाही सण.. पोलिस कर्मचारी तहान भूक विसरत रस्त्यावर उभे राहत आपले कर्तव्य बजावत असतो मात्र नाशिकमध्ये अनंत चतुर्दशीला बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देते वेळी एका पोलिसातील वारकरी जागा झाल्याच चित्र बघायला मिळालं. जिल्ह्यातील चांदोरी गावात यंदा 'एक गाव एक गणपती' हा उपक्रम राबवण्यात आला होता, तुरटीपासून तयार करण्यात आलेल्या गणरायाची मूर्ती पालखीमध्ये ठेवून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी गावातून मिरवण्यात आली आणि याच मिरवणुकीत आपल्या कामाचा सर्व ताणतनाव विसरत बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी नवनाथ नायकवाडी यांनी ठेका धरला होता, हाती वीणा घेत तुकोबाचे अनेक अभंगही त्यांनी यावेळी गायले.
Continues below advertisement