Jalna : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची पेढ्याची तुलना, कार्यक्रमावेळी कोरोना नियमांना हरताळ
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची आज जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या राजळा गावात ग्रामस्थांनी पेढे तुला केली, केंद्रात रेल्वे खाते मिळाल्यानंतर प्रथमच राजळा गावात रावसाहेब दानवे यांनी दौरा केला, यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांनी दानवे यांचा सत्कार केला आणि पेढे तुला केली, मात्र या सर्व कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना की कोण्या गावकऱ्यांना कोरोनाच्या कोणत्याच नियमाचं भान राहिलं नव्हतं.