Nashik Lockdown | नाशिककरांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाऊन; पोलिस आयुक्तांचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2021 10:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून आता नाशिक पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झालाय. शहरातील 25 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, यापैकी 2 पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नाशिक शहरात गेल्या 5 दिवसात तब्बल 4 हजार 138 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळं रुग्ण वाढत राहिले आणि नागरिक नियमांचे पालन करत नसतील तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असा इशारा पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिलाय.