Nashik | हेल्मेटसक्तीची संधी साधून नाशिकमध्ये 'डर का बिझनेस' ; स्टिंग ऑपरेशनद्वारे 'माझा'कडून पोलखोल

एबीपी माझानं लशींचा काळाबाजार करणाऱ्यांची पोलखोल केली. त्यानंतर मंत्रालयाला दारुड्यांचा अडडा बनवणाऱ्यांचा पर्दाफाश केला.... आणि आता आम्ही नाशकातल्या नो हेल्मेट नो पेट्रोल नियमावलीचा बोजवारा उडवणाऱ्यांचं पितळ उघडं पाडणार आहोत. नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती करताना पोलिसांनी हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही, असा नियम केलाय. पण पोलिसांनी केलेली ही सक्ती अनेकांसाठी काळा धंदा सुरू करण्याची संधी ठरलीय. पेट्रोलपंप चालकांकडूनही पोलिस आयुक्तांनी केलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचं दिसतंय. एबीपी माझानं नाशिकमधल्या हेल्मेटसक्तीचा फोलपणा स्टिंग ऑपरेशन करून समोर आणलाय. आगळीवेगळी संकल्पना म्हणून नाशिकात पोलिसांनी गाजावाजा करून सुरू केलेली हेल्मेटसक्ती किती फोल आहे याचा पर्दाफाश माझानं केलेल्या स्टिंगमध्ये करण्यात आलाय. पाहुयात नाशिकमध्ये अनेकांनी सुरु केलेला डर का बिझनेस हा काळाधंदा नेमका आहे तरी काय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola